लातूर (Latur Police) : लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसीत इतर उद्योगाच्या नावाखाली कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊसमध्ये राजरोस बनावट गोवा गुटखा निर्मिती करणाऱ्या (Gutkha Factory) कारखान्यावर मंगळवारी ((दि.२८) अखेर कारवाईचे धाडस (Latur Police) लातूरच्या पोलिसांनी दाखविले. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने धाड टाकून या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारखान्यातून १०७ पोती बनावट गोवा गुटखा तसेच त्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्यासह ३ कोटींचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. लातूरमधील हाय प्रोफाईल उद्योजकासह जागामालक कामगार असे सातजण आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हायप्रोफाईल उद्योजकाच्या बनावट गोवा गुटखा कारखान्याचा पर्दाफाश
एमआयडीसी परिसरात असलेल्या गोदामातून यापूर्वी कोट्यवधींचा (Gutkha Factory) अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. (Latur Police) लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसी भागातील सी-२७ मधील कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊसमध्ये सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 362/2024 कलम 328 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेअर हाऊस येथे मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेली ही कारवाई बुधवारी सकाळपर्यंत चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वात सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, राजेश घाडगे, पो. कॉ. विष्णू गुंडरे, अनंतवाड, कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांच्या पथकाने धाड टाकली. गोवा गुटख्याचे ४८ पोते, खुल्या स्वरूपात तयार करून ठेवलेला गोवा गुटखा ५९ पोते, सुगंधित तंबाखू, सुगंधी पावडर, गोवा गुटखा, पॉकेट कव्हर, पॅकींग मशीन व इतर साहित्य तसेच पिकअप वाहन असा ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत (Latur Police) पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यामध्ये विजय केंद्रे (रा. लातूर), धनंजय गहिनीनाथ कोंबडे (रा. लातूर), पारस बालचंद पोकर्णा (रा. लातूर), राम केंद्रे (रा. लातूर) या प्रमुख आरोपींसह अंकुश रामकिशन कदम (रा. रामवाडी, ता. चाकूर), हसनाकुमार तिलाई उराम (रा. बिहार), गोकुळ धनराम मेघवाल (रा. राजस्थान) हे कामगार सहभागी आरोपी आहेत, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.
३ कोटींचा गुटखा जप्त!
लातूरमध्ये अवैध स्वरूपात चालू असलेल्या या कारखान्यावर (Latur Police) लातूर पोलिसांनी पहिल्यांदाच धाड टाकली. ३ कोटी रूपयांवर मुद्देमाल जप्त केल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या कारखान्यात काही बालकामगार देखील काम करत असल्याचे या कारवाईत उघड झाले. राज्यात गुटखाबंदी असतानाही लातूरमध्ये विमल व गोवा गुटखा निर्मितीचे पेव आहे. दिवसाढवळ्या राजरोस गुटखा निर्मिती (Gutkha Factory) करुन लातूरसह जिल्हा तसेच बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुरवला जात होता. लातूरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. परवा माध्यमांमध्ये या बनावट गुटखा निर्मिती कारखान्याबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर (Latur Police) पोलीस प्रशासनाने लोकलज्जेपोटी कारवाईचे पाऊल उचलले.
निलंगा तालुक्यात सीमाभागात परवा केलेल्या एका क्लबमधील हायप्रोफाईल तिर्रट जुगारावरच्या कारवाईचे पुढे जे झाले, तसेच या कारवाईचेही होईल, अशी चर्चा सूज्ञ लातूरकर आता करीत आहेत. अक्षरशः टूकांनी लातूरसारख्या शहरात गुटखा तयार केला जातो. त्याची विक्री केली आते, खुलेआम अवैध व्यवसाय चालतो. चीड निर्माण होणारा हा प्रकार लातूर एमआयडीसी पोलीस मॅनेज झाल्यानेच सुरू होता काय? याचे उत्तर (Latur Police) पोलीस लातूरकरांना देतील का? हा खरा सवाल आहे.