लातूर (Latur Police) : लातूर पोलिसांनी शुक्रवारी (दि.7) गुटखा कारखान्यावर (Gutkha factory) धाड टाकून 44 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राहुल कोल्ड्रिंक्स, प्लॉट नंबर 148 या गोदामात हा गोरख धंदा चालू होता. याप्रकरणी विजय केंद्रे, जयपाल जाधव, बाळासाहेब वाघमारे, मल्हारी मजगे आणि अर्जुन केदार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस (Latur Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, असे पत्रक जिल्हा पोलीस अधीक्षकांंनी प्रसिध्दीस दिले आहे.
लातूरच्या एमआयडीसीत पोलिसांची धाड
एमआयडीसी पोलिसांना (Latur Police) गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील राहुल कोल्ड्रिंक्स, प्लॉट नंबर 148 या गोदामावर दिनांक 7 जून रोजी छापा (Police Raid) टाकला असता शासन प्रतिबंधित गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य असे 44 लाख 22 हजार 678 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर प्रकरणी यातील आरोपी विजय केंद्रे, जयपाल जाधव, बाळासाहेब वाघमारे, मल्हारी मजगे आणि अर्जुन केदार यांच्याविरुद्ध एमआयडीसी (Latur Police) पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर प्रकरणी (Latur Police) सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, भागवत फुंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस डी नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक कराड, सहाय्यक फौजदार जगताप, पोलीस हवालदार पिस्तुलकर, पोलीस हवालदार देशमुख, पोलीस नाईक भोसले, गाडे पोलीस अंमलदार दळवे व चालक पोलीस अंमलदार जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी बजावली.
लातूर पोलिसांकडून पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरात (Gutkha factory) गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून 44 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अतिरिक्त एमआयडीसी परिसरात (Latur Police) लातूर पोलिसांकडून गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून ३ कोटी रुपया पेक्षा जास्त किमतीचा गुटखा व गुटखा बनविण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त (Police Raid) करण्यात आला होता.