लातूर( Latur):- ओबीसी समाजाचे संघर्ष योद्धे प्रा. लक्ष्मणराव हाके यांच्यावर काल जीवघेणा हल्ला (fatal attack) झाला. हा हल्ला ओबीसीवरील हल्ला आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा या हल्ल्याच्या विरोधात जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा लातूर येथील सकल ओबीसी समाजाच्या (OBC Category)आज निवासी उप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
हल्लेखोराना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा
महाराष्ट्रात सद्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष सुरु असताना काही समाज कंटक हा वाद भडकवण्याचे काम करीत आहेत. पुण्यात प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्याला जसास तसे उत्तर दिले जाऊ शकते, मात्र आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानाच्या मार्गांवर चालणारे आहोत. हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हालाही जसास तसे उत्तर देता येते.. असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सकल ओबीसी समाजात प्रा. हाके यांच्यावरील हल्ल्याने रोश व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सकल ओबीसी समाजाचे ऍड. गोपाळ बुरबुरे, भारत काळे, सुदर्शन बोराडे, भागवत पांचाळ, प्रा. एकनाथ पाटील, बाबुराव शेल्लाळे, दुर्गाप्पा चव्हाण, अजित निंबाळकर, विश्वनाथ पांचाळ, अशोक नलवाडे, बी. पी. बिराजदार, दगडू साहिब पडिले, पद्माकर वाघमारे, हरिभाऊ गायकवाड, वसंत ठोले आदींचा समावेश होता.