लातूर ( Latur ) :- असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लातूर तालुक्यातील निळकंठ येथील श्री निळकंठेश्वर (Shri Nilakantheshwar) या देवस्थानास राज्य शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ दर्जा (‘B’ grade) प्राप्त झाला असून या मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा आणि भाविक भक्तांच्या सोयी सुविधेचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा; निश्चितपणे पाच कोटी रुपयांचा निधी राज्यातील महायुती शासनाकडून मिळवून देऊ, अशी ग्वाही भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी दिल
भाजपाचे नेते आ.रमेशआप्पा कराड यांची ग्वाही
श्री निळकंठेश्वर देवस्थानास राज्य शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र ( State Govt Rural Pilgrims ) विकास योजनेअंतर्गत ‘ब’ दर्जा मिळवून दिल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचा श्री निळकंठेश्वर देवस्थान आणि निळकंठ, पिंपळगाव, आंबा, मसला, भोसा, तांदूळजा यासह विविध गावातील भाविक भक्त आणि नागरिकांच्या वतीने लातूर येथे भाजपाच्या संवाद कार्यालयात शनिवारी दुपारी यथोचित सत्कार करण्यत आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास योजनेचा ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. निळकंठ आणि परिसरातील नागरिकांनी मंदिराच्या विकासाचा एकीने निर्णय घेतला. ही आनंदाची बाब असून आपण सर्वजण मिळून चांगला विकास घडून आणू, असेही ते म्हणाले.
‘ब’ दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला सत्कार
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन (Coordination of the program ) चंद्रकांत कातळे यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, श्री निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शिवदत्त औताडे, भुजंग औताडे, गणेश पुरी, किरण शिंदे, शालीक औताडे, शिवाजी आंबेकर, चेअरमन चंद्रकांत वागस्कर, प्रभू औताडे, श्यामसुंदर वाघमारे, भैरवनाथ पिसाळ, बापूराव बिडवे, अशोक सावंत, कमलाकर भुसारे, महेश आताडे, अच्युत पिसाळ, हनुमंत औताडे, मधुकर बिडवे, रामभाऊ पिसाळ, सुभाष पिसाळ, तानाजी ढोबळे, महादेव बिडवे, बापुराव बिडवे, मेघराज पिसाळ, विजय पिसाळ, युवराज औताडे, अच्युत पिसाळ, सुखदेव कुकर, रामेश्वर पाटील, वामन बिडवे, मधुकर बिडवे, मुन्ना पिसाळ, अभिषेक बिडवे, अर्जुन वाघमारे, रामभाऊ पिसाळ, औदुंबर पवार, यांच्यासह पिंपळगाव आंबा, निळकंठ, भोसा, मसला, तांदूळजा परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.