लातूर (Latur) :- नोव्हेंबर महिन्यात नीचांकी म्हणजे प्रतिक्विंटल 3300 भाव मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गुरुवारी दिनांक 9 जानेवारीला सोयाबीन (soybeans) त्याखाली घसरले गुरुवारी लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला 3151 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हा किमान भाव असून कमाल भाव प्रतिक्विंटल 4350 असा राहिला. केंद्र सरकारचे (Central Govt) आयात निर्यात धोरण फसल्याने नव्या वर्षात शेतकऱ्यांवर ही आफत ओढवली आहे.
गतवर्षाच्या तुलनेत संपलेल्या खरीप हंगामात महाराष्ट्रमध्ये सोयाबीनचे उत्पादन अधिक
महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गुजरात व इतर राज्यांमध्येही सोयाबीनचे उत्पादन अधिक घेतले गेले. यंदा उत्पादनात चांगली वाढ झाली; मात्र बाजारात सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव कायम राहिला. इतकेच नव्हे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी सोयाबीन काढणीला सुरुवात झाली. त्याचवेळी बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमालीचे घसरले. जवळपास 35 ते 3600 प्रतिक्विंटल असा सोयाबीनला भाव मिळत गेला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तर प्रतिक्विंटल ते 3300 रुपये किमान दर सोयाबीनला मिळाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दुसरा पंधरवडा व डिसेंबर महिना सरासरी 4 हजारांच्या आसपास प्रतिक्विंटल सोयाबीनचा भाव राहिला. मात्र नव्या वर्षांमध्ये हा भाव काही वाढताना दिसत नाही.
लातूरच्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4190 रुपये भाव मिळाला
लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीच्या आडत बाजारात गुरुवारी सोयाबीनचा सौदा निघाला तोच मुळात 3151 रुपयांपासून. हा सौदा 4350 रुपयांवर गेला. म्हणजे 13373 क्विंटलची आवक असताना लातूरच्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4190 रुपये भाव मिळाला. किमान भाव प्रतिक्विंटल 3151 चा विचार केला तर मावळत्या खरीप हंगामात सोयाबीनला मिळालेला आजपर्यंतचा हा सर्वात नीचांकी भाव ठरला आहे.