लातूर (Latur ST reservation) : धनगर समाज एस. टी. आरक्षण (ST reservation) अंमलबाजावणीच्या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते अनिल भागवत गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी आमरण उपोषण केले. गेली ७० वर्षे सत्तेत येणारे प्रत्येक सरकारने धनगर समाजाला घटनेने दिलेले आरक्षण डावलले. (Dhangar Samaj) धनगर समाज पालात व द-याखो-यात राहणारा, आपला परंपरागत व्यवसाय शेळी-मेंढी पालन व्यवसायासाठी रानोमाळ भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला घटनेने दिलेल्या एस.टी. च्या शैक्षणिक व राजकीय आरक्षणापासून जाणूनबुजून वंचित ठेवण्याचे काम येथीलशासत्ताधा-यांनी केल्याचा आरोप करीत हे उपोषण करण्यात आले.
आजपर्यंत या (Dhangar Samaj) समाजाने आरक्षण हक्कासाठी संवीधानिक मार्गाने सरकारच्या विरोधात अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, मोर्चे, रेल रोको, इ. आंदोलने विधायक मार्गाने केली. याची साधी दखलही सरकारने घेतली नाही व धनगर (ST reservation) एस.टी. आरक्षणसंदर्भात अद्यापर्यंत कुठलीच ठोस कार्यवाही केलेली नाही. सबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाचे युवक व कार्यकर्ते संतापलेले आहेत. म्हणून लातूर येथील प्रातिनीधीक स्वरुपात खालील धनगर कार्यकर्त्यांनी अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.