लातूर (CM Ladki Bahin Yojana) : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी (Latur Tehsil) लातूरचे तहसील लाडक्या बहिणींच्या गर्दीने फुलून गेले. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी उत्पन व रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी दोन दिवसांमध्ये जवळपास सात हजारांवर अर्ज तहसील प्रशासनाकडे आले आहेत. दरम्यान गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी (Latur Tehsil) तहसील परिसरात दलालांची टोळी सक्रीय झाल्याने अनेक लाडक्या बहिणींना दलाल भाऊरायाला ओवाळणी टाकावी लागत असल्याची जोरदार चर्चा आहे.
उत्पन व रहिवाशी प्रमाणपत्रांसाठी दोन दिवसांमध्ये सात हजारांवर अर्ज!
दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने (CM Ladki Bahin Yojana) जाहीर केली. १ ते १५ जुलैपर्यंत फॉर्म भरून घेण्याची प्रक्रियाही चालू केली. आता या योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचे व अधिवास प्रमाणपत्रे (Residence Certificate) काढण्यासाठी बहिणींची प्रचंड गर्दी तहसील परिसरात झाली आहे. तहसील आवारात अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही. उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी लातूर तहसील आवारात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही कागदपत्रे काढण्यासाठी तलाठ्याचीही सही लागते. ती मिळविण्यासाठी बहिणी अक्षरशः त्या कार्यालयावर तुटून पडल्या आहेत. हे फॉर्म भरून घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अंडर ग्राऊंड येथील महा-ई-सेवा केंद्रावर (Maha-e-Seva Kendra) अक्षरशः रांगा लागल्या आहेत. (Latur Tehsil) तहसील कार्यालयाच्या वतीने आवारात मदत केंद्र उभे केले आहे. पण, त्याकडे कोणी फिरकतही नव्हते.
मुख्यमत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) महिलांना महिना १५००/- रूपये मिळणारी योजना (Women and Child Welfare) महिला व बालकल्याण विभागाची आहे. १ जुलैपासून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रियाही चालू केली आहे. त्या योजनेसाठी उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढण्याचे असल्याने तहसील कार्यालय परिसरात अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. इतकेच नव्हे, तर काहीवेळा मेनरोडवरही गर्दीमुळे चक्काजाम झाल्याचे प्रकार घडले.
सूसूत्रता आणण्याचा प्रयत्न
या योजनेसाठी अचानक (Latur Tehsil) तहसील कार्यालयात गर्दी झाल्याचे निदर्शनास येताच निवासी उपजिल्हाधिकारी नेटके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे, तहसीलदार सौदागर, तांदळे, सर्व नायब तहसीलदार सदर प्रमाणपत्र मिळविण्यात सुसूत्रता यावी, कोणाला त्रास होऊ नये यासाठी नियोजन करीत आहेत. उद्या यासाठी काही टेबल वाढविणे, प्रमाणपत्र काढण्यास येणाऱ्या महिलांना टोकण देणे आदी उपाययोजना आखत आहेत.
दलाल दिसताच तात्काळ संपर्क साधा
उत्पन्न प्रमाणपत्र (Income certificate), आधिवास प्रमाणपत्र अथवा इतर कोणतेही प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणी दलाल भेटून पैशाची मागणी केल्यास किंवा कोणत्याही (Maha-e-Seva Kendra) महा-ई-सेवा केंद्रात रितसर फी पेक्षा अधिकच्या पैशाची मागणी केल्यास लातूर तहसील कार्यालयाशी तात्काळ संपर्क करावा. निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तात्काळ कारवाई करू असे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दैनिक ‘देशोन्नती’शी बोलताना सांगितले.