निलंगा(Latur) :- लातूर झहिराबाद हायवेवरील एका पेट्रोल पंपावर(Petrol Pump) गाडीत पेट्रोल भरून गावाकडे जात असलेल्या एम.एच.२४ झेड ५८८१ क्रमांकाच्या मोटारसायकलला एम.एच.२४ बी.डब्लू ०२९७ या क्रमांकाचे वाहन रापका येथून जनावराची चंदी घेऊन निलंग्याकडे जात असलेला भरधाव टेम्पोने मोटारसायकला समोरासमोर जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवर समोर बसलेली आराध्या अकाश कोरे वय २ वर्षे ही लहान मुलगी जागीच ठार झाली असून वडील अकाश निळकंठ कोरे वय २७ वर्षे पत्नी मनिषा अकाश कोरे गंभीर जखमी झाले असून अकाश कोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात स्थळावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. मालवाहू टेम्पो धडक दिल्यानंतर हायवे लगतच्या खड्ड्यात पलटी झाला असून ड्रायव्हर अपघात होताच अपघात (Accident)स्थळावरून पळून गेला आहे.
Latur Accident: भरधाव टेम्पोची मोटारसायकलला धडक लहान मुलगी जागीच ठार; आई वडील गंभीर
