हडोळती (Latur) :- अहमदपूर तालुक्यातील किन्नीकदु येथील शिक्षकाने गुरुवारी दुपारी २.३० वाजता आपल्या कुंटुंबासह टोकाचे पाऊल उचलत तिघांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. अहमदपूर तालुक्यातील किन्नीकदु हे २०० उंबऱ्याचे व १५०० लोकसंख्येचे गांव. शुक्रवारी दुपारी किन्नी येथे एकाच चितेवर तिघांवर अंत्यसस्कार (funeral) करण्यात आले. त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता, यामुळे गाव अंर्तमुख झाले, अशा भावना गावकऱ्यातून व्यक्त होत होत्या.
किन्नीकदुकरांची चूलच पेटली नाही
गुरुवारी गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (५३) , पत्नी रंजना मसनाजी तुडमे (३५), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (२२) यांनी टोकाचे पाऊल उचलत रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. गोदावरी नदी (Godawari river)पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर एका शिक्षकाच्या कुटुंबाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. मसनाजी सुभाष तुडमे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. शिक्षक मसनाजी तुडमे, पत्नी रंजना मसनाजी तुडमे आणि मुलगी अंजली यांचे मृतदेह (Dead-Body)रेल्वे ट्रॅकजवळ आढळले. परळीकडे कोळसा घेऊन जात असलेल्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत त्यांनी आत्महत्या केली. गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या धारखेड शिवारात ही घटना घडली.
या कुंटुंबाने आत्महत्या का केली?
तिघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी अहमदपूर तालुक्यातील किन्नीकदु येथे आणण्यात आले. त्यांना एकाच चितेवर अग्नी देताना ग्रामस्थांनी डोळ्यातील आसवांना वाट करुन दिली. या दुर्घटनेमुळे किन्नीकरांनी चूल पेटवली नाही. प्रसंगी गावात एकच आक्रोश पाहायला मिळाला. गेल्या वर्षीच मसनाजी तुडमे यांच्या जावायाचे अपघाती निधन झाले होते. एका वर्षातच कुंटूब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या कुंटुंबाने आत्महत्या का केली? एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकले नाही.