अहमदपूर (Latur) :- उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर खरडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक(Illegal sand transport) करणारे ३ हायवा टिप्पर पकडून ६० लाख ७५ हजार हजारांच्या मुद्देमालासह ६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अहमदपूर पोलिसात दि ४ व ५ मार्च रोजी गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.
वाहनांसह ६० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६ जणांवर गुन्हा दाखल
उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खरडे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती करुन दि ४ व ५ मार्च रोजीच्या रात्री गस्तीवर पाठवले. गोपनीय माहीतीच्या आधारे ४ मार्च रोजी सकाळी ६ च्या सुमारास अहमदपूर हाडोळती मार्गावरील हिप्पळगावच्या पुलावर एक अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा तसेच ५ मार्च रोजी काळेगाव रोड अहमदपूर येथे सकाळी ८.१५ वाजता व त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता सांगवी फाटा नांदेड रोडवर असे दोन अवैध वाळू भरलेले हायवा पकडण्यात आले. या दमदार कामगिरीमध्ये दोन दिवसांत तीन अवैध वाळू वाहतुक करणारे हायवा पकडण्यात आले. ६० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोह तय्यब मुमताज शेख व पोकॉ. रूपेश बालाजी कज्जेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरूण सुधाकर गुट्टे (वय ३३, रा. हनुमान टेकडी अहमदपूर), संतोष सतिष शेळके (रा. कोकणगा), माधव ज्ञानोबा होळकर (वय ३२, रा. शेंद्री सुनेगाव) सखाराम बाजगीर (रा. लेक्चर कॉलनी, अहमदपूर) चक्रधर दिलीप बुधवारे (वय ३१, रा. कोळवाडी) व विजय पाटील (रा. परचंडा ता. अहमदपूर) यांच्यावर अहमदपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता बि.एन.एस गुरनं. १३७, १४१, १४४ / २०२५ कलम ३०३ ( २ ), ३ ( ५ ) पर्यावरण अधिनियम १५ नुसार ४ व ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे




