लातूर (Latur):- आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने लातूरचे पालकमंत्री (Guardian Minister) श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शुक्रवारी (दि.२८) लातूर येथील विश्रामगृह येथे शिष्टमंडळाद्वारे भेट घेत लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत बैठक लावण्याची मागणी केली.
आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने ना. भोसले यांची घेतली भेट
लातूर जिल्हयातंर्गत कला, वाणिज्य, विज्ञान ,औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय, कायम विनाअनुदानित ८० असे एकूण ११६ महाविद्यालय आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१० आहे. या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना नांदेडला पायपीट करावी लागते. शेजारच्या सोलापूर जिल्हयासाठी महाविद्यालयांची संख्या १०९ असताना विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे. राज्याचे माजी मंत्रीद्वय आ. अमित देशमुख व आ. संजय बनसोडे यांनीही लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याबाबत सहानुभूती पूर्वक विचार व्हावा, अशा आशयाचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांना दिले होते तर आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार यांनीही मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनात विद्यापीठाची मागणी लावून धरली.
एक लाख पत्रांच्या माध्यमातून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी
शिवाय लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत कलम ३ (२) नुसार शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे असल्याचा अहवाल शिक्षण संचालक श्री डॉ. धनराज माने यांनी दि.१५.९.२०२० रोजी अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग (Department of Higher and Technical Education), मंत्रालय मुंबई यांना सादर केला आहे. त्यामुळे निकषांवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन भावी अशी मागणी वारंवार सरकारकडे केली आहे. शिवाय आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने तमाम लातूरकरांच्यावतीने वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, धरणे आंदोलन, निदर्शने, उपोषण आंदोलन, तत्कालीन मुख्यमंत्री ना. श्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एक लाख पत्रांच्या माध्यमातून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील यांच्यासमवेत बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी मुख्य संयोजक अँड. प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, बालाजी पिपळे, अँड. सुहास बेद्रे, सुशील सुरवसे , सुनिल खडबडे आदींची उपस्थिती होती.