लातूर (Latur vakil Morcha) : दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यावर न्यायदान कक्षेमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून, बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
दर मोर्चा सकाळी ११.३० वाजता लातूर न्यायालय परिसरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला. या मोर्चामध्ये सर्व वकील बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदविला. लाल फिती लावून वकील बांधवांनी शांततेत आपला निषेध नोंदविला. या (Latur vakil Morcha) मोर्चाच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र न्यायसंस्थेतील अशा प्रकारच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा व सुरक्षितता अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पडला. दि.०७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या घटनेचा निषेध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता, आज दिवसभर वकील बांधवांनी लाल फित लावून कामकाज केले. या मोर्चामध्ये (Latur vakil Morcha) लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. योगेश डी. जगताप, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. आण्णाराव पाटील, लातूर जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. संजय जगदाळे, महिला उपाध्यक्ष अॅड. मनीषा दिवे पाटील, सचिव अॅड. गणेश गोजमगुंडे, ग्रंथालय सचिव अॅड. प्रणव रायपूरकर, सहसचिव अॅड. निलेश मुचाटे, महिला सहसचिव अॅड. अभिलाषा गवारे, कोषाध्यक्ष गणेश कांबळे तसेच अॅड. उदय गवारे, अॅड. गंगाधर कोदळे, अॅड. लहू सुरवसे, अॅड. राजकुमार गंडले, अॅड. शिवकुमार बनसोडे, अॅड. गोविंद शिरसाट, अॅड. नागनाथ बद्दे, अॅड. एम डी ठाकूर, अॅड. उगीले, अॅड. सुनंदा मोटे इंगळे, अॅड. इरफान शेख , अॅड. हनुमंत वैजाळे, अॅड. सोमेश्वर बिराजदार, अॅड. कोमल राठोड, अॅड. दौलत दाताळ , अॅड. निखिल काळगे, अॅड. शिल्पा शहादाद पुरी, अॅड. अनिल चुणगुणे, अॅड. नितीन राठोड , अॅड. दीपक माने व लातूर जिल्हा वकील मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.