उदगीर(Udgir):- विधानसभा निवडणुकीत(Assembly Elections) आपला उमेदवार विजयी होईल की नाही याची चाचपणी प्रत्येक राजकीय पक्षाकडून सर्व्हेच्या माध्यमातून केली जात असते. असे सर्व्हे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) आणि त्यांची मातृसंस्था नेहमीच आघाडीवर राहत आली आहे. लोकसभा निवडणुकीत संघाच्या सर्व्हेतून श्रृंगारे यांना उमेदवारी दिली तर जागा धोक्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, संघाच्या सर्व्हेला यापुढे गांभीर्याने घेतले जाणार आहे. आता, उदगीर विधानसभा मतदारसंघात अशाच एका सर्व्हेची जोरदार चर्चा असून संघाने भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी गोळा केलेल्या माहितीने, घड्याळ भाऊंची झोप उडविली असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाचे पारंपरिक मतदार व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडे आकर्षित
सदरील सर्व्हेत, फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, व पारंपरिक मतदारांची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यानुसार, महत्वाची व धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपाचे पारंपरिक मतदार व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा थेट फटका निकालावर पडणार असल्याने चर्चेला ऊत आला आहे.
दादांच्या सर्व्हेतून पास, संघाच्या नापास..
यंदा अजित पवारांनी त्यांच्या उमेदवारांसाठी स्वतंत्र सर्व्हे केला असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. त्यात, विद्यमान आमदार संजय बनसोडे पास होणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र, संघाने केलेल्या सर्व्हेतून तेच आमदार नापास होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कुणाच्या सर्व्हेला महत्व देणार.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या आहेत सर्व्हेच्या चर्चेतून समोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या व पारंपरिक मतदारांच्या तक्रारी..
- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले..
- मागच्या पाच वर्षात विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी कायम भाजपाच्या कार्यकर्त्यांचा तिरस्कार केला..
- तोंडावर गोड बोलून पाठीमागे अपमानास्पद वागणूक दिली व बदनामी केली..
- तालुक्यावरील भाजपाच्या चार नेत्यांनाच गुत्तेदारी, बूथ प्रमुख व गावपुढारी आणि निष्ठावंत वंचित..
- यंदा जर घड्याळ निवडून आले तर उदगीर मतदारसंघावर कायमस्वरूपी त्यांचा दावा राहील, त्यामुळे, मोठ्या मेहनतीने निर्माण केलेली कमळाची ताकद इतरांना मोठे करण्यात वाया जाईल..
- विधानसभा एकत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केलेले आहे. त्यामुळे विधानसभेला घड्याळाला मतदान देवून त्यांचा आमदार केला तर, तेच आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद वापरतील..
- महायुतीत उदगीर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कोंग्रेसकडे न देता, भारतीय जनता पार्टीनेच लढवावा यासाठी कार्यकर्ते आग्रही.