पद्मभूषण डॉ. विजय भटकर: विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) नामकरण कोनशिलेचे अनावरण!
लातूर (Latur) : भारत भूमीत अमुलाग्र बदल घडत असतांना, रामेश्वर रूई (Rameshwar Rui) या गावाचे नामांतर विश्वधर्मी मानवतातीर्थ (Vishwadharma Humanatirtha) म्हणून करण्यात आले आहे, तो दुर्लभ योग आहे. या देशात 6 लाख गावे असून आता येथे ही मोठे बदल घडतील. यामुळेच भारत देश संपूर्ण जगात आदर्श राष्ट्र (Ideal Nation) म्हणून उदयास येईल, असे विचार जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या प्रेरणेने व पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या आशीर्वादाने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) नामकरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई)’ नामकरण कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी विश्वशांंती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड होते. तसेच माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड व आमदार रमेश कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे व राजेश कराड हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,ज्येष्ठ कवी व लेखक डॉ.संजय उपाध्ये, गिरीश दाते उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ. मंगेश तु.कराड, डॉ.संजय उपाध्ये यांनीही आपले विचार व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले, तर डॉ. सुचित्र कराड नागरे यांनी आभार मानले.
विश्वशांतीसाठी ज्ञान ज्योतीचे प्रज्वलन!
विश्वबंधुत्व, सर्वधर्मसमभाव (Pantheism), समंजस्य आणि एकोप्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेलं गावं विर्श्रवधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे मंगळवारी ‘विश्वशांतीची ज्ञान ज्योती’ चे प्रज्वलन करण्यात आले. नंतर ही ज्योत डॉ. विश्वतीत नागरगोजे आणि सहकारी यांचेकडे हस्तांतरण करण्यात आले. ही ज्योत ज्ञानभूमी आळंदीपासून, सांप्रदायिक सद्भावनाभूमी अजमेर, शक्तिभूमी अमृतसर आणि तिथून भारताची आध्यत्मिक राजधानी अयोध्या इथे प्रभु श्रीरामचंद्रांना वंदन करून बोधगया, वैशाली, जेरूसलेम, व्हॅटिकन सिटी मार्गे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) कार्यालयात समर्पित करण्यात येणार आहे.
ज्ञान यज्ञ भूमी…
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ‘देशाला जाती धर्माचा शाप लागला आहे. अशा वेळेस वारकरी संप्रदाय (Warkari Sect) हा मानवतेचा संदेश देणारा धर्म आहे. त्याग आणि समर्पणामुळे या गावाची ओळख ज्ञान यज्ञ भूमी म्हणून झाली आहे. वर्तमान काळात जगाची अवस्था ही अत्यंत वाईट होत चालली आहे. अशा वेळेस सर्वांना शांतीची आवश्यकता आहे. ज्या वेळेस घराचा कर्ता बिघडतो त्या वेळेस घर बिघडते. तसेच देशाच्या कर्त्याला अहंकार आला, तर देशाची स्थिती बदलू शकते, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’
कोणताही भेदभाव करणार नाही..
आमदार रमेश कराड (MLA Ramesh Karad) म्हणाले, ‘या गावाचे भाग्य असून सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा हा दिवस आहे. डॉ. कराड यांच्या कार्यामुळे या गावाची ओळख संपूर्ण जगात झाली आहे. डॉ. कराड यांनी ज्ञानाचे मंदिर उभे करून पुढची पिढी घडविली आहे. गावातील नागरिकांनी संकल्प घ्यावा की कोणताही भेदभाव करणार नाही. डॉ. कराड यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन समर्पित केले.’
महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी!
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, ‘रामेश्वर गावाची नोंद महाराष्ट्राने (Maharashtra) घेऊन या संदर्भात जीआर काढावा. या गावातील हिंदू-मुस्लिमांनी आर्थिक योगदान देऊन सर्व धर्मांचे स्थळ उभे करावे. वर्तमान काळातील स्थिती पाहता, आपल्याला युद्धाकडून बुद्धाकडे (Buddha) जावयाचे आहे.’