26 फेब्रुवारीपासून शुभारंभ : आज देवस्थान सभा मंडपात बैठक
लातूर (Latur) : लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर (Shri Siddheshwar) व रत्नेश्वर देवस्थानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री यात्रा (Mahashivratri Yatra) महोत्सव होत असून यंदाचा हा 72 वा यात्रा महोत्सव आहे. यात्रा महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 28) सायंकाळी 4.30 वा. श्री सिध्देश्वर देवस्थान सभा मंडपात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवाचे आयोजन उत्साहात!
लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या (Temple) वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रतिवर्षी यात्रा महोत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात येते. या यात्रा महोत्सवाचे केवळ लातूर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात मोठे आकर्षण आहे. या यात्रेस भाविकांसह (Devotee) नागरिकांची मोठी गर्दी असते. हा यात्रा महोत्सव याही वर्षी 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रा महोत्सवाचे हे 72 वे वर्ष असून महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त, यात्रा कमीटी सदस्य, भाविक-भक्त व प्रतिष्ठीत नागरिक आपले योगदान देतात. या वर्षीचा यात्रा महोत्सव कसा असावा आणि त्या विषयी नियोजन कसे असावे, याकरीता देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीस देवस्थानचे विश्वस्त, यात्रा कमिटी सदस्य (Member of Yatra Committee), भाविक-भक्त व प्रतिष्ठीत नागरिक यांच्यासह शिवभक्तांनी (Shiva Devotee) बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.