नागपूर (Nagpur):- ग्रीनलॅम इंडस्ट्रीज या भारतातील पहिल्या ३ मधील आघाडीच्या सरफेसिंग सोल्युशन्स उत्पादक (Manufacturer of surfacing solutions) कंपनी तर्फे नागपूर (Nagpur)येथील क्वेटा कॉलनी स्थित सदानी असोसिएट्समध्ये एक्स्क्लुझिव्ह डिस्प्ले सेंटरची सुरुवात केली आहे. या सेंटरमध्ये ग्रीनलॅम लॅमिनेट्सच्या लॅमिनेट्स विभागातील वैविध्यपूर्ण असे कलेक्शन सादर करण्यात येणार आहे.
उच्च गुणवत्तेच्या आणि सुंदरतेने युक्त अशा सरफेस सोल्युशन्सचे उत्पादक म्हणून प्रसिध्द
ग्रीनलम इंडस्ट्रीज ही कंपनी उच्च गुणवत्तेच्या आणि सुंदरतेने युक्त अशा सरफेस सोल्युशन्सचे उत्पादक म्हणून प्रसिध्द आहे. यांची परंपरा म्हणजे सर्वोत्कृष्टतेसाठीची ओढ आणि यासह कलात्मकता आणि अचूकतेचा संगम हा त्यांच्या महत्त्वपूर्ण ब्रॅन्ड्सच्या माध्यमातून प्रदर्शित होतात. त्यांच्या वैविध्यपूर्ण रेंज मध्ये टेक्स्चर, रंग आणि डिझाईनचे सर्वोत्कृष्ट मिश्रण हे ग्रीनलॅमच्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिले जाते. ग्रीनलॅमच्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण काम करणारी उत्पादने उपलब्ध करुन दिली जात असून यामुळे ते त्यांच्या जागेची सुंदरता वाढवून अंतर्गत सजावटीचीही कलात्मकता वाढीस लागण्यास मदत होते.
ग्राहकांना सर्वोत्कृष्ट लॅमिनेट्स आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मिळतात
ग्रीनलॅम तर्फे प्रत्येक लॅमिनेटचे उत्पादन हे अतिशय सखोल अशा अभ्यासाअंती तयार केलेले असून त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट लॅमिनेट्स आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मिळतात. वुड ग्रेन्स पॅटर्न (Wood Grains Pattern) पासून सॉलिड सरफेसेस पर्यंत प्रत्येक सजावटीचे उत्पादन हे निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक जागांसाठीच्या गरजांनुसार तयार करण्यात येतात. ग्रीनलॅम लॅमिनेट ॲन्ड अलाईड ग्रीनलॅम इंडस्ट्रीजचे कंट्री हेड श्री. अनुज संगल यांनी सांगितले “ ग्रीनलॅम इंडस्ट्रीजमध्ये आम्ही नेहमीच निवासी आणि व्यावसायिक जागांचे सौंदर्य वाढवणा-या गुणवत्तापूर्ण उपायांना उपलब्ध करुन देण्यासाठी वचनबध्द असतो. आमच्या डिस्प्ले सेंटर मध्ये आमच्या इंटिरियर स्पेसेस श्रेणीतील सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करुन दिली जातात.”