मानोरा (Sanjay Rathore) : वाशिम जिल्हा हा आकांक्षित असुन अति मागासलेला आहे. या जिल्ह्याला विकसित करण्यासाठी उद्योजकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच तांडयात वास्तव करणाऱ्या बंजारा समाजाला अधिक विकसित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा सुधार योजना सुरू करण्याची मागणी (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे पालकमंत्री ना संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी शनिवारी पोहरादेवीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आगमन म्हणजे देश आणि बंजारा समाजासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देश भरात बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा बोली भाषा एकच असतानाही या बंजारा समाजाला राज्य घटनेच्या आठव्या अनुसुचित आणण्यासाठी केंद्र शासनाकडून सहानुभूतीपुर्वक विचार होणे आवश्यक आहे. बंजारा तांडयाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन होणे आवश्यक आहे. तसेच स्वदेश योजनेअंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदतिचीही गरज आहे. अकांक्षित जिल्हा वाशीम व लगतच्या यवतमाळ या जिल्हयामध्ये रोजगाराच्या पाहिजे त्या प्रमाणात संधी उपलब्ध नाही. त्यामुळे या जिल्हयात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जिएसटी सह अन्य करमध्ये सुट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.