सकाळी दुसरा कंटेनर आला
आखाडा बाळापूर/हिंगोली (Hydrogen peroxide) : गुजरात राज्यातील एका कंपनीतुन हायड्रोजन पैरॉक्साइड (Hydrogen peroxide) घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या कंटेनरला बुधवारी गळती लागली. सदर बाब लक्षात येताच सदर कंटेनर वाशीम जिल्ह्यातुन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच सदर कंटेनरला सुरक्षित कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात उभे करून काही घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा व प्रशासनाने रात्रभर दक्षता घेतली अधिकारी कर्मचारी घटनास्थळ परीसरात थांबून होते. गुरुवारी दहा वाजता दुसरा कंटेनर कंपनीच्या वतीने तसेच गळती रोखण्यासाठी पथक पाठवण्यात आले सुरक्षित उपाययोजना करून आवश्यक ती कामे सुरू होती असे आखाडा बाळापूर पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी सांगितले. घटनास्थळी हिंगोली व कळमनुरी अग्नीशामक दल पथकाकडून मोठे परीश्रम करण्यात आले.
महामार्गावरून जात असलेल्या टँकर क्र.एन.एल.०१-क्यु.६००६ च्या पाठीमागील उजव्या बाजुचा टायर फुटुन टँकरचे नुकसान होऊन त्यामध्ये असलेला (Hydrogen peroxide) हायड्रोजन पेरॉक्साईड केमीकल ची गळती होत होती टँकर चालक याने वाहन तसेच हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत आणले सदर बाब समजताच पोलीस प्रशासन व अग्निशमन दल वाहन सोबत देऊन सदर कंटेनर कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात सुरक्षित स्थळी मोकळ्या जागी उभा करण्यात आला. संबंधित कंपनीच्या वतीने गळती रोखण्यासाठी पथक पाठवण्यात आले आज सकाळी पथक व नवीन वाहनद्वारे सुरक्षित उपाययोजना करून वाहन नेण्यासाठी प्रक्रिया सुरू होती.
सदर प्रकरामुळे विशेष दक्षता घेत आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके,महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे, सय्यद तयब अली, मोहम्मद वसीम, शेख आसीम, शेषराव पोले,ढाकणे, नायब तहसीलदार कोकरे,बालाजी रेड्डी,मंडळ अधिकारी तेलावर, तलाठी भुक्तार, पोलिस कर्मचारी शेख अनसार, शिवाजी पवार, अरविंद जाधव, गजानन सरकटे , अग्निशमन दल भागवत धायतडक,संजय ननवरे,अरबाज बेग, इसा बेग, दिपक गायकवाड, रघुनाथ बांगर, साहील थिटे कळमनुरी अगनीशामक दल पथक सह पोलीस, महसूल कर्मचारी अधिकारी घटनास्थळी होते.
शाळेला सुट्टी; पोलिस पाटील दक्ष
वायु गळती लागलेला कंटेनर जरोडा शिवारातील मोकळ्या जागी बुधवार रात्री थांबवण्यात आला. सदर परीसरात आसलेल्या महात्मा फुले हायस्कूलला गुरूवार सुट्टी देण्यासाठी तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी रात्री पोलिस पाटलांना सुचना केली होती. यामुळे गुरूवारी शाळेला सुट्टी होती. दरम्यान (Hydrogen peroxide) वायु गळती वाहन जरोडा शिवारात उभे केले तेव्हापासून जरोडा पोलीस पाटील अनुराधा जाधव, राजेश पाटील जरोडेकर, कामठा पोलीस पाटील गजानन मोरे,येलकी पोलीस पाटील कैलास चौतमल यांनी घटनास्थळ परीसरात थांबून ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली.