महावितरण आढावा बैठक संपन्न
पातुर (MLA Nitin Deshmukh) : तालुक्यातील विविध विद्युत संलग्नित प्रश्न विद्युत पुरवठा खंडित सोलर शेती पंप विविध प्रश्नांसाठी शिवसेना उभाठा गटाचे बाळापुर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी आढावा बैठक दिनांक 30 ऑगस्ट रोजी घेतली यामध्ये घरगुती ग्राहक शेती ग्राहक यासह ग्रामस्थांच्या व तालुक्यातील जनतेच्या विविध विद्युत विषयी समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांच्या कडे तक्रारी सुपूर्त करून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता गौरक्षनाथ सपकाळे उपकार्यकारी अभियंता आशिष रंगारी अभियंता बोरकर सातिंगे महावितरणचे वरिष्ठ कर्मचारी ग्रा.चे बोचरे, संतोष निमकंडे नरेंद्र बोरकर , निलखन, महेंद्र खोकले, सपना सुरवाडे तथा पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे सुरज झडपे तालुक्यातील विविध (MLA Nitin Deshmukh) ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य नागरिक महावितरणचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.