मुंबई (Devendra Fadnavis) : राज्यातील महावितरण (Mahavitran), महापारेषण, महानिर्मिती कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक पिळवणूक कंत्राटदार करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषद सभागृहात सांगितले. आमदार श्रीकांत भारतीय (MLA Srikanth Bharatiya) यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
राज्यातील शासकीय वीज कंपन्या कंत्राटी (Mahanirmiti Company) कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार विरहित रोजगार मिळवून देण्यासाठी हरियाणा कौशल्य विकास बोर्ड प्रमाणे नवीन यंत्रणा उभारणे, कामगारांच्या वेतनात वाढ करणे याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय (MLA Srikanth Bharatiya) यांनी प्रश्न विचारला होता. हरियाणा राज्यातील सर्वच बाबी सध्याच्या धोरणात समावेश झाला आहे. सध्या कंत्राटी कामगारांच्या खात्यामध्ये मानधन पाठवले जाते.
मात्र काही कंत्राटदार पैसे वापस मागतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची चौकशी करून पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत प्रवेश मार्ग सुकर व्हावा यासाठी प्रतिवर्ष 2 गुण असे 5 वर्षासाठी जास्तीत जास्त 10 गुण देण्यात येतात. वेतन वाढीच्या दृष्टीने सकारात्मक विचार करीत असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. चर्चेदरम्यान सदस्य सतेज पाटील व भाई जगताप यांनी भाग घेतला.