मुंबई (Legislative Council Election) : येत्या 11 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या (Legislative Council Election) निवडणुकीसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज 5 नावाची घोषणा केली. या यादीमध्ये चित्रा वाघ यांचा समावेश असेल, असा कयास बांधला जात होता, मात्र त्यांना आता वाट बघावी लागणार असल्याचे आज निश्चित झाले. भाजपच्या (Central Election) केंद्रीय निवडणूक समितीने आज पाच नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये (Pankaja Munde) पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) , योगेश टिळेकर, डॉ. परीणय फुके (Dr. Parinay Phuke) आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे.