हिंगोली (Legislative Council Elections ) : लोकसभेची रणधुमाळी संपताच विधान परिषद निवडणुकीची (Council Elections) घोषणा झाली आणि हिंगोली जिल्ह्यातुन अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंगे बांधली आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडुन इच्छुक असलेल्या (Ramdas Patil Sumathankar) रामदास पाटील सुमठाणकर यांनी लोकसभेसाठी चांगलीच तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी ही दाखल केली होती. त्यांनी आपली उमदेवारी परत घ्यावी म्हणून मंत्री गिरीष महाजन व आ. श्रीकांत भारतीय यांनी त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यावेळी पक्षातर्फे त्यांना भविष्यात संधी मिळेल असे आश्वासन मिळाले होते.
विधान परिषदेसाठी इच्छुकांची फिल्डींग
यावरून त्यांना संधी मिळेल अशी जिल्ह्यात चर्चा आहे. त्यांच्याच पक्षातील श्रीकांत पाटील चंद्रवंशी (Shrikant Patil Chandravanshi) हे सुध्दा लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांचे पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या काही समर्थकांना वाटत आहे. भारतीय जनता पक्षातील माजी आ. गजानन घुगे (Gajanan Ghuge) यांनी सुध्दा (Council Elections) विधान परिषदेसाठी चांगलीच ‘फिल्डींग’ लावल्याचे बोलले जात आहे.महायुतीमध्ये कळमनुरीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असून सध्याचे आमदार संतोष बांगर हेच आगामी विधान सभेत उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित असल्याने गजानन घुगे हे विधान परिषदेसाठी नशीब आजमावत असल्याची चर्चा आहे. ठराविक कोट्यानुसार भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळणार असल्याने हिंगोलीतुन एखाद्याला संधी मिळेल याची शक्यता राजकीय तज्ञांना मात्र अजीबात जाणवत नाही.
काँग्रेसमध्ये आ.प्रज्ञा सातवांचे नाव आघाडीवर
कॉग्रेस पक्षाच्या नेत्या व दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचे नाव काँग्रेसमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वी (Nagesh Patil Ashtikar) खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांनी आघाडीचा धर्म पाळला नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी ही तक्रार विधानसभेची पूर्व तयारी असल्याचे बोलले जात होते; परंतु विधान परिषदेत सातवांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांना ब्रेक लावण्यासाठी शिवसेनेच्या नथीतून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी तर हा तीर मारला नसावा, अशी ही चर्चा होत आहे.
१२ जुलै रोजी होणार मतदान २५ जून पासुन नामनिर्देशन सुरू झाले असून ५जुलैपर्यंत उमेदवारी दाखल होणार आहे. तोपर्यंत उमेदवारी बाबत चर्चेचे गुर्हाळ सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.