मुंबई (Maharashtra Ambadas Danve) : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Demons) यांचे 5 दिवसाचे झालेले निलंबन 5 दिवस ऐवजी 3 दिवस करण्यात आले आहे. आता उद्यापासून अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील. विधान परिषद (Legislative Council) सभागृहात आज सकाळी भाजपचे आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी एक निवेदन वाचून दाखवले. त्यात त्यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निलंबन कालावधी बाबत सरकार काही निर्णय घेणार असेल तर त्यात त्यांचे समर्थन असल्याचे सांगितले होते. त्यावर निलंबन रद्द होईल असे संकेत मिळाले होते.
दरम्यान, काल ऊबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अनिल परब यांनी याबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सभागृहात निवेदन करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली होती. यावर विचार करणार असल्याचे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. आज प्रसाद लाड यांचे निवेदन झाल्यानंतर, पाऊण तासाने संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी 5 दिवस ऐवजी 3 दिवस करावा असा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात मतदानासाठी मांडला. त्याला होकार देत सभागृहाने मान्यता दिली.
१ जुलै रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हिंदू विरोधी वक्तव्यावरून विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडून प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांना शिवीगाळ झाली होती. त्यावरून 2 जुलै रोजी अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवस निलंबनाची कारवाई करण्यात आली. अंबादास दानवे यांच्या वागणुकीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफी मागावी लागली होती.