नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांचा शपथविधी संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
परभणी (Legislative Council) : विधान परिषद सदस्यपदी निवडून आलेले नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी रविवार २८ जुलै रोजी आमदारकीची शपथ विधान भवनात घेतली. नुकत्याच पार पडलेल्या (Legislative Council) विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये आ. राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढविली होती त्यामध्ये त्यांचा विजय झाला.रविवार २८ जुलै रोजी विधान भवनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, आ.पंकजा मुंडे, आ. सदाभाऊ खोत आदींची उपस्थिती होती.
आ.विटेकर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर सरपंच पदापासून आमदार पदापर्यंत आहे. त्यांनी गंगाखेड कृषि उत्पन्न बाजार समितचे संचालक, सोनपेठ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदी पदे भुषविली आहेत. २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची त्यांनी तयारी सुध्दा केली होती.
मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा सहकारी पक्षाला गेल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधी मंडळावर घेण्याचा शब्द दिल्यानंतर त्यांची नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीमध्ये निवड करण्यात आली. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ओळख मिळून देण्यात संघटन मजबुत करण्यासाठी (Rajesh Vitekar) आ. विटेकरांचे मोठे योगदान आहे. (Legislative Council) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतांना त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध विकास कामे केल्याने त्यांची ओळख आहे. त्यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला एक तरूण, तडफदार आमदार मिळाल्याने विकास कामांना गती मिळेल. आ.विटेकरांच्या निवडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.