बाळापूर (Leopard Attack) : येथून जवळ असलेल्या सातरगाव येथील २१ वर्षीय युवकावर शेतात बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने तोडात पकडलेल्या पायाने लाथ मारल्यामुळे पळ काढल्याने युवकाचे प्राण वाचले. बाळापूर तालुक्यात विशेषत: मन नदीच्या तिरावरील अनेक गावांमध्ये (Leopard Attack) बिबट्याचे दर्शन घडत असताना वन विभाग मात्र हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद कारवाई करण्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
सातरगाव येथील गोपाल राजू कसुरकार (२१) हा युवक सातरगाव नजीक असलेल्या शेतात गेला असता त्याचे शेतात १ बिबट, २ पिल्ले होती. त्यामधील बिबट्याने गोपाल याचेवर झडप घालून त्याचा डावा पाय पकडला. परंतु गोपाल याने पकडलेल्या पायाला झटका दिला (लाथ मारली) त्यामुळे (Leopard Attack) बिबट्या बछड्यांसह निघून गेला. बाळापूर तालुक्यातील चिंचोली, तामशी, बटवाडी बु., बटवाडी खू., सातरगाव, हिंगणा, कान्हेरी, मनारखेड, कसुरा, कळंबा, कळंबी, डोंगरगाव, लोहारा, कवठा, बहादूरा, वझेगाव, निंबी, हिंगणा, (निंबा) काजीखेड, आदीसह अनेक गावांतील नागरिकांना बिबट्या दिसत असल्याच्या घटना घडत आहेत.
या संदर्भात योग्य ती कारवाई करून हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी असलेला वनविभाग मात्र कुठलिही भूमिका घेण्यास तयार नाही. बाळापूर तालुक्यातील अनेक गावांतील जनावरांचा फडशा या (Leopard Attack) बिबट्याने पाडला आहे. आजच्या सातरगाव येथील युवकाच्या अक्कल हुशारीने मात्र त्याचे प्राण वाचले. (ता.प्र.)