परभणी/दैठणा (Parbhani):- तालुक्यातील दैठणा शेत शिवारात बिबट्या (Leopard) सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण(atmosphere of fear) पसरले आहे. वन विभागाने(Forest Department) या ठस्स्यांची तपासणी करुन शेतकर्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.
वनविभागाने लक्ष देण्याची मागणी
मागील काही दिवसात परभणी तालुक्या-सह पाथरी तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. दैठणा शेत शिवारात अनंतराव कच्छवे यांच्या पेरुच्या बागेमध्ये बिबट्या सृदश्य प्राण्याच्या पायाचे ठसे (footprints) आढळून आले. शेजारील शेतकरी राम लाड यांच्या शेतामध्येही असेच ठसे दिसून आले आहेत. बिबट्या आला का काय या शंकेने शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.