आर्णी (Yawatmal) :- अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या (Leopard) ठार झाल्याची घटना बुधवारला रात्री दहाच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर लोणबेहळ ते कोसदणी (घाट) दरम्यान घडली. १५ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास साकुर शेतशिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्याच रात्री अंबोडा येथे बिबट्याने राऊत नामक इसमाची गोठ्यात बांधून असलेल्या करोडीवर हल्ला केला होता.
शेतकऱ्यांना बिबट्याचे झाले दर्शन
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेमुळे वनविभाग बिबट्याच्या शोधात होती. काल बुधवारला रात्री दहा ते अकराच्या सुमारास रस्ता ओलांडताना कुण्यातरी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागी ठार झाला. सदर वृत्त वनविभागाला मिळताच सावळी वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.