वर्धा(Wardha):- तालुक्यातील केळझर गावासमोरील काही अंतरावर बिबट्या(Leopard)जखमी अवस्थेत काही नागरिकांना आढळून आला. अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक देऊन वाहन तेथून पसार झाले.
ही घटना आज सकाळी पहाटे पाच वाजता च्या सुमारास घडली बिबट्या जखमी (Injured)अवस्थेत असताना थोड्या वेळाने त्याचा मृत्यू (Death)झाला. या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी वन विभागाच्या(Forest Department) अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली सेलू क्षेत्र सहाय्यक उईके बीट रक्षक आडे वनरक्षक डाकोरे यांनी केळझर रोडवरील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत पावलेल्या बिबट्याला पाहण्या करिता परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.