अकोट (leopard skin sale) : बिबट या वन्यप्राण्याची कातडी विक्री करण्याच्या बेतात असणार्या ३ तस्करांना अकोट रेल्वे स्टेशननजिकच्या पुलाजवळ पुणे येथील सीमाशुल्क विभाग, जीएसटी व अकोला वनविभाग यांनी संयुक्तरित्या सापळा रचून २७ जानेवारी रोजी रंगेहात अटक केली होती. या तिघांनाही प्रथम अकोट न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी दिली होती. सदर मुदत संपल्यानंतर शनिवारी या आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना आणखी ७ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या (leopard skin sale) प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वन अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे येथील सीमाशुल्क विभाग तसेच जीएसटी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी अकोला येथील वन विभागाच्या अधिकार्यांना सोबत घेवून अकोट रेल्वे स्टेशन नजिकच्या पुलाजवळ २७ जानेवारी रोजी सापळा रचला होता. या सापळ्यात बिबट या वन्यप्राण्याची कातडी विक्री करण्याच्या बेतात असता, आशिष कन्हैय्यालाल सिकची, नंदकिशोर श्रीकिसनदास सिकची व राजकुमार श्रीकिसनदास सिकची यांना अटक करून या आरोपींकडून बिबट या वन्यप्राण्याची संपूर्ण असलेली कातडी व दुचाकी जप्त केली आहे.
सदर कातडी ही साधुवेषामध्ये असलेल्या व अकोट येथील एका लॉजवर गेल्या काही महिन्यापासून महिलेसह वास्तव्यास असलेल्या व्यक्तीने विक्रीसाठी अकोट येथे आणून सिकची बंधूंमार्फत तीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. (leopard skin sale) वन विभागाचे पथक या साधूच्या शोधकामी लागले असले तरी या साधूचा थांगपत्ता अद्यापतरी लागला नाही. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी वन कोठडी संपल्यानंतर पुन्हा शनिवारी तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या वन कोठडीत ७ दिवसांची वाढ केली आहे.