कळमनुरी (Leopards Attack) : शहरातील काही अंतरावर असलेल्या देवधरी शिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतात काम करणार्या शेतकर्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील आठ दिवसापासून देवधरी शेत शिवार परिसरात एक बिबट्या (Leopards Attack) मुक्त संचार करताना शेतात दिसला यानंतर देवधरी शिवारातील असलेल्या तलावात बिबट्या हा पाणी पिताना काही शेतकर्यांनी पाहिल्याची चर्चा होत आहे. या चर्चेमुळे रात्रपाळीला आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री शेतामध्ये जात नव्हते फक्त दिवसा जात होते; परंतु २० डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास देवधरी शिवारातील तलावात पाणी पिण्यासाठी (Leopards Attack) बिबट्या आल्या असल्याची माहिती काही शेतकर्यांनी दिल्या नंतर या परिसरातील शेत शिवारात काम करणार्या मजुरासह शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
कळमनुरी तालुक्यातील देवधरी शिवारात गेल्या आठ दिवसापासून (Leopards Attack) बिबट्या दिसल्याची चर्चा शेतकर्यात होत असल्याने शेतीमध्ये काम करणारे व जवळपासच्या गावकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वन विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.