पातुर (Akola):- सध्या महाराष्ट्र मध्ये धनगड जातीचे आदिवासी जमाती मधील धनगर या अक्षराचा फायदा घेत शासन आदिवासी समाजावर अन्याय होईल. या उद्देशाने धनगड व धनगर हे एकच आहेत असे दर्शविण्यासाठी समिती शासनाने स्थापन केलेली आहे. त्यानुसार शासन धनगर समाजाला आदिवासींमध्ये घुसविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे समस्त आदिवासी समाज आक्रमक झाला असून कुठल्याही प्रकारे या समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे.
समस्त आदिवासी समाज आक्रमक
माननीय उच्च न्यायालयाने (High Courts) दिनांक 19/03/2024 या दिवशी धनगर आदिवासी नाहीत म्हणून आदेश दिले आहेत तथापि सर्वोच्च न्यायालयाने अपील नंबर 84, 56, 2024 नुसार धनगर आदिवासी नाही म्हणून 20/04/2024 रोजी धनगर आदिवासी नाही तसा निर्णय देत केस रद्द केलेली आहे. राज्यघटनेत अनुच्छेद 366/25 नुसार अनुसूचित जमातीची व्याख्या केली आहे. त्या व्याख्येनुसार धनगर समाज कधीच आदिवासी होऊ शकत नाही तरी देखील निवडणुका समोर ठेवून शासन मुद्देसूतपणे धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समाविष्ट निर्णय काढत आहेत. या आशयाचे निवेदन आदिवासी बांधवांनी सादर केले व आरक्षण विरोधी भूमिकेचा च विरोध म्हणून अकोला वाशिम बायपास उड्डाणपूल पेट्रोल पंप (Petrol Pump) समोर आदिवासी बांधवांनी पद्धतीने धरणे आंदोलन दिले. यावेळी सुधाकर शिंदे यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले तर यावेळी प्रीतम खुळे हरिदास करवते उत्तम माहुरे सरपंच अर्चना शिंदे पंचायत समिती सदस्य अर्चना डाबेराव गजानन घोगरे रामचंद्र लोखंडे अविनाश भाऊ बंधरे, विष्णू डाबेराव संजय लोखंडे मा.सभापती विलास धोंगळे सुहास देवकर गजानन झाडे गोपाल लोखंडे गोलू मे टांगे सागर लठाड सचिन लठाड, धनराज शिंदे नंदू देवकर व समस्त आदिवासी बांधव महिला पुरुष अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.