भिवापूर (LIC agent case) : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून रात्री घराकडे परत येत असताना तीन लोकांनी एका एलआयसी एजंटवर प्राणघातक हल्ला केला.ही घटना शुक्रवारी दि.10 रात्री 8.30वाजताचे सुमारास घडली.तीन्ही आरोपीवर भिवापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विष्णुदास लक्ष्मण दुनेदार 50 रा. मानोरा तह. भिवापूर असे हल्ला झालेल्या एजंटचे नावआहे.तर अंकित नागो पोपटकर, अतुल नागो पोपटकर व चंदू जयपाल उके असे (LIC agent case) गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार विष्णुदास दुनेदार हे मानोरा येथील गौतम मेश्राम यांचे घरुन साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात असतांना अंकित नागो पोपटकर, अतुल नागो पोपटकर व चंदू जयपाल उके या तिघांनी रस्त्यावर अडवून ग्राम पंचायत मधील जुना वाद उकरून हातातील लाकडी काठीने डाव्या हातावर डोक्यावर मारुन खाली पाडले व जखमी केले तसेच अश्लील शिविगाळ केली अशी तक्रार दाखल केली.मध्यस्थी करण्यास आलेल्या अमीत ठाकरे व योगेश कुमरे यांना देखील आरोपींनी हातबुक्यांनी मारहाण केली व अश्लील शिविगाळ करून मारहाण केली.या मारहाणीत विष्णुदास यांच्या डोक्याला जबर मार लागला असून रक्तस्राव झाल्याने पत्नी व मोहोल्ल्यातील लोकांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
विष्णुदास दुनेदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंकित नागो पोपटकर, अतुल नागो पोपटकर व चंदू जयपाल उके यांचेवर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 118(1),296,351( 2,3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.