कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील घटना
हिंगोली (Son Murder Case) : कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे नेहमीच आईची बाजू घेण्याच्या कारणातून अल्पवयीन मुलास जन्मदात्या पित्याने २८ डिसेंबर २०१८ रोजी अॅटोमध्ये बसवून गळफास देऊन मारहाण केली होती. परंतु त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नसल्याने डोक्यात दगड घालून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकुन दिला होता. यामध्ये जन्मदात्या पित्यावर खुनाचा गुन्हा (Son Murder Case) दाखल झाला होता. न्यायालयात अंतिम सुनावणीत पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा व ७५ हजाराचा दंड सुनावला.
जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधिश सरोज एम. माने/ गाडेकर यांनी सुनावला निकाल
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे बाबुराव भगवानराव शिकरे याने आपला स्वत:चा मुलगा वैभव बाबुराव शिखरे (१४) नेहमी आईची बाजू का घेतो याचा राग मनात धरून २८ डिसेंबर २०१८ रोजी रात्रीच्या सुमारास त्याला झोपेतून उठवून अॅटोमध्ये बसवून कुंभारवाडी शिवारात कुर्तडी पाटी जवळ नेऊन सुताच्या दोरीने वैभवला गळफास देऊन मारहाण केली होती. यामध्ये त्याचा (Son Murder Case) मृत्यू झाला नसल्याने वडील बाबाराव ने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड डोक्यात मारून ठार मारल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने येडशी गावात अरविंद शिखरे यांच्या घरासमोरील पायर्यावर मृतदेह टाकून दिला होता.
सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून बाबुराव शिकरे याच्यावर खुनाचा गुन्हा (Son Murder Case) दाखल केला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक जी.एस. राहीरे, व्ही.एम. केंद्रे यांनी केला. हे प्रकरण हिंगोली जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधिश सरोज एम. माने/ गाडेकर यांच्या समोर चालले. ज्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी १४ साक्षिदार तपासून युक्तीवाद केला. ज्यामध्ये काही जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
५ मार्चला अंतिम सुनावणीत बाबुराव भगवानराव शिखरे याला कलम ३०२ भादवी अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व ५० हजाराच्या दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक वश्र सश्रम कारावास आणि खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने भादवी २०१ मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व २५ हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्यात असा आदेश जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधिश सरोज एम. माने/ गाडेकर यांनी दिला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एन. एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. तर त्यांना सरकारी वकील एस.डी. कुटे, श्रीमती एस. एस. देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि टी. एस. गुहाडे, कोर्ट पैरवी महिला कॉन्सटेंबल सुनिता धनवे यांनी सहकार्य केले.
न्यायालयाच्या नविन इमारतीत पहिलीच आजन्म कारावासाची शिक्षा
हिंगोली जिल्हा हा प्रथमच न्यायिक जिल्हा २२ फेब्रुवारी रोजी झाल्यानंतर न्यायालयाच्या नविन इमारतीत खुना सारख्या गंभीर गुन्हयात पहिलीच आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. महत्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष व फॉरंन्सीक लॅबचे पुरावे तपासीक अमलदारांनी केलेला तपास महत्वपूर्ण ठरला. आरोपी पित्याने स्वत:च्याच १४ वर्षीय मुलाचा निर्घुण खून (Son Murder Case) केल्यानंतर न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. परंतु आरोपी पित्याच्या चेहर्यावर पश्चातापाचा कोणताही भाव दिसून आला नाही.