अन्ननलिकेत ५ रुपयाचे अडकलेले नाणे काढूण चिमूकलीला दिले जीवदान
उदगीर (Life Saving Procedure) : शहरातील डाॅ.पंकज मुंडे यांच्या सिद्धिविनायक चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे वैद्यकीय कौशल्याचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. केवळ ३ वर्षांच्या बालकाच्या वरच्या अन्ननलिकेत अडकलेले ५ रुपयांचे नाणे डॉ.पंकज मुंडे यांनी तात्काळ आणि अत्यंत कौशल्याने फॉलीज कॅथेटरच्या सहाय्याने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या प्रसंगामुळे संभाव्य धोका टळून लहाण ३ वर्षाच्या बालकाचा जीव वाचला.
शेख सफा फय्याज या तीन वर्षाच्या चिमुकल्या बाळाने खेळताना चुकून ५ रुपयांचे नाणे गिळले. त्यानंतर त्याला गिळताना त्रास होऊ लागला. उलटया होवू लागल्या त्यावेळी घाबरलेल्या पालकांनी त्वरित सिद्धिविनायक चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. एक्स-रे तपासणीत नाणे वरच्या अन्ननलिकेत अडकल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ.पकज मुंडे यांनी विलंब न लावता फॉलीज कॅथेटर तंत्राचा वापर केला. अत्यंत काळजीपूर्वक आणि तांत्रिक अचूकतेने ही प्रक्रिया पार पाडत नाणे सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत यशस्वी झाली. उपचारानंतर बालकाची प्रकृती स्थिर असून तो सुखरूप आहे.
या यशस्वी उपचारामुळे पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले असून शहरातही या कामगिरीचे कौतुक होत आहे. वेळेवर घेतलेला निर्णय, आधुनिक वैद्यकीय कौशल्य आणि तत्पर सेवा यामुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला.
सिद्धिविनायक चिल्ड्रन्स हॉस्पिटलची आपत्कालीन परिस्थितीत यशस्वी कामगिरी
सिद्धिविनायक चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या या कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. फाॅलीज कॅथेटर ने गिळलेले नाणे काढून लहाण बालकाला जीवदान मिळाले डाॅ.पंकज मुंडे ३ वर्षाच्या चिमूकल्या लहाण बाळाने ५ रुपयाचे नाणे गिळले होते ते बाळ डाॅ.आयुब पठाण सरांकडे उपचारासाठी गेले होते त्यावेळी राञभर निगराणीखाली माझ्याकडे ठेवण्याचा सल्ला डाॅ.आयुब पठाण यांनी दिला त्यानंतर सकाळी ते भूल देवुन नाणे काढणार होते पण मी ही परस्थिती पाहुण आधुनिक फॉलीज कॅथेटर उपचार पध्दतीने त्या लहाण बाळाच्या गळयातील नाणे काढले ही थोडी अवघड प्रक्रीया आसली तरी सुरक्षीतपणे बाळाचा गळयातील नाणे काढण्यात यशस्वी झालो.आशी माहिती प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डाॅ.पंकज मुंडे यांनी दिली.
पालकांसाठी आवाहन : लहान मुलांच्या आवाक्यात नाणी, बटणे, बॅटऱ्या किंवा लहान वस्तू ठेवू नयेत. अशा घटना टाळण्यासाठी सतत देखरेख आवश्यक आहे.




