जयपूर येथे झाला पुरस्कार वितरण सोहळा
वसमत/हिंगोली (Lifetime Achievement Award) : पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन , माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना जयपुर(राजस्थान) येथे साखर उद्योगातील भरीव कामगीरी बद्दल शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मंगळवारी जयपूर येथे झालेल्या कार्यक्रमासाठी सहकार क्षेत्रातील मान्यवरांची होती दि शुगर टेक्नॊलॊजिस्ट असोशिएशन ऒफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेने (Lifetime Achievement Award) लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Jayaprakash Dandegaonkar) यांना प्रदान केला.
30 जुलै रोजी जयपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुविद्य पत्नी, ज्योतीताई दांडेगावकर,कुटुंबातील सर्व सदस्य वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे यांच्यासह वसमत तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, पुर्णा कारखान्याचे संचालक आदींनी हजेरी लावली होती पुरस्कार प्रदान होतांना दांडेगावकर (Jayaprakash Dandegaonkar) यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्कार केला.