पुसद(Pusad):- तालुक्यातील बेलोरा येथील नामदेव पांडुरंग मारकड वय 40 वर्ष हे रोहडा शिवारात दि. २३ जून रोजी दुपारी १२:३० वाजता दरम्यान लाईन चे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर(Electric poles) चढले, चढण्यापूर्वी महावितरणच्या कार्यालयातील ऑपरेटरला सदर खांबावरील लाईन बंद करण्यासंदर्भात त्यांनी सांगितले होते. मात्र ऑपरेटरच्या (Operator) हलगर्जीपणामुळे खांबावरील लाईन बंद केली नाही. विजेचा प्रवाह महावितरण (distribution)कंपनीच्या कर्मचारी यांना सांगून सुध्दा वीज प्रवाह खंडित करण्यात आला नसल्याने काम सुरू करायचे अगोदरच विजेचा शॉक(Electric shock) लागून खाजगी लाईनमनचा खांबावरच विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सदरची दुर्दैवी घटना
मृतक नामदेव पांडुरंग मारकड हे मागील 14 ते 15 वर्षापासून महावितरण कंपनीच्या कर्मचारी, लाईनमन (Lineman)यांचे सोबत काम करीत होते . घटनेच्या दिवशी लाइन चे काम करणार असून विजेचा प्रवाह बंद करा म्हणून कल्पना देऊन सुध्दा विजेचा उच्च दाबेचा प्रवाह सुरूच राहिल्यामुळे त्यांचा विद्युत खांबावरच जागेवर मृत्यू (Death)झाला. मृत्यु होऊन मृतदेह (Deadbody)साधारण एक तास विजेच्या खांबावरच लटकलेल्या अवस्थेत होता तरी सुध्दा महावितरण कंपनीचे अधिकारि कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले नसल्यामुळे लगतच्या तीन-चार गावातील रोहडा, बेलोरा, मारवाडी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत वाशिम पुसद मार्गावरील मारवाडी येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
रोहडा शिवारातली घटना
जो पर्यंत महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी येऊन मृतक नामदेव मारकड यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देणार नाहीत तो पर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे मृतकाचे शवविच्छेदन (Autopsy) करणार नसल्याचे मृतकाचे भाऊ पवन मारकड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तर समस्त संतप्त गावकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. सदर घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील हे आपल्या पोलीस (Police)ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत तर परिस्थितीचे गांभीर्य बघत इतर ठिकाणावरूनही घटनास्थळी पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे.
, संतप्त गावकऱ्यांचा मारवाडी येथे रास्ता रोको
यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना पुसद शहरासह तालुक्यात घडल्या आहेत. महावितरण कंपनीकडून रोहित्र बसविताना कंत्राटदारांना सुरक्षा संबंधी योग्य त्या सूचना दिल्या जात नाहीत. तर कंत्राटदार सर्रास अकुशल कामगारांची भरती करून लाईनचे काम करीत असतात, रोहित्र बसविण्याचे काम करीत असतात, काही काळापूर्वी वालतुर रेल्वे येथे रोहित्र बसविताना विजेचा शॉक लागून ओंकार बाबाराव जाधव हा तरुण जागीच ठार झाला होता. शहरातही अशा अनेक घटना घडल्या. तरीही महावितरण कडून कुठलीही काळजी, दक्षता घेतल्या जात नाही. तर कंत्राटदारांचे मनमानी कारभार सुरू असतो यावरही महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही हे विशेष.