हिंगोली (State Excise Raid) : राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सामुहिक मोहीम राबवुन निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली, निरीक्षक, भरारी पथक, हिंगोली, दुय्यम निरीक्षक हिंगोली यांचे पथकाने कळमनुरी, हिंगोली, वसमत परिसरात हातभट्टी, अवैध मद्य विक्री / वाहतुकीवर छापा टाकून ९ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. सदर कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या १५५ बाटल्या, विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या २५ बाटल्या, हातभट्टी २० लिटर, रसायन २२५ लिटर असा एकुण रु. २६,३५०/- (रु. सव्वीस हजार तीनशे पन्नास) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ९ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत (State Excise Raid) गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ही (State Excise Raid) कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री मोहन मातकर, प्र. निरीक्षक भरारी पथक, हिंगोली श्री टी. बी. शेख, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी , प्रदिप गोणारकर , ज्योती गुट्टे तसेच स.दु.नि. कांबळे जवान आडे, राठोड व ईतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.