हिंगोली – कळमनुरी, वसमत परिसरात कारवाई
हिंगोली (Liquor raids Case) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरात १९ व २० ऑक्टोंबरला छापे मारून ११ जनांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार ७७० रुपयाचा देशी विदेशी दारूसाठा (Liquor raids Case) व एक वाहन जप्त करण्यात आले.
विधानसभा आदर्श आचारसंहीता अनुशंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ व २० ऑक्टोंबर रोजी सामुहीक मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्क हिंगोली, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, हिंगोली व दुय्यम निरीक्षक बीट क्रमांक १, २ व ३ यांच्या पथकाने हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरात अवैध मद्यवाहतुक व विक्री विरुध्द कारवाई करून ११ दारू विक्रेत्यांवर महाराष्ट्र दारू बंदी कायदा १९४९ च्या कलमातंर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
१ लाख ३४ हजाराचा देशी – विदेशी दारूसाठा जप्त
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, दुय्यम निरीक्षक टि.बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदिप गोणारकर, ज्योती गुड्डे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक देशमुख, कांबळे, जवान आडे, राठोड, यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी पार पाडली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९ व २० ऑक्टोंबरला हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरात मारलेल्या छाप्यात देशी मद्याच्या ६३५, विदेशी मद्याच्या १३ बॉटल, ३० लिटर हातभट्टी दारू, १० लिटर रसायन व एक वाहन असा एकुण १ लाख ३४ हजार ७७० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगस्त करून ११ आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४८९ चे कलमातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कोणत्याही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्यास त्याची माहिती दारू बंदी विभागाला दिल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांनी दिली आहे.