परभणी/ताडकळस (Parbhani):- येथील पोलीसांच्या पथकाने मंगळवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास उखळद ते त्रिधारा पाटीकडे जाणार्या रोडवर धामोडी नाल्याजवळ केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जाणारे पशुधन जप्त केले. वाहनासह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धामोडी नाल्याजवळ केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जाणारे पशुधन केले जप्त
सपोनि गजानन मोरे, पोउपनि शिवकांत नागरगोजे, पोलीस अमंलदार अतुल टेहरे, रामकिशन काळे, वर्हाडे यांच्या पथकाने कारवाई(action) केली. पोलीसांचा एका आयशर वाहनातून पशुधन कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरुन पोलीसांची संशयीत वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनात एकुण १८ जनावरे होती. या कारवाईत ७ लाख रुपये किंमतीचे वाहन, ३ लाख १० हजार किंमतीचे पशुधन जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी पोशि अतुल टेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेख मुखद्दर, सय्यद मुन्ना, शेख समीर, शेख ईसाक, शेख मुजम्मील, शेख अली, शेख मोबीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह काळे करत आहेत.