मानोरा (Sand smuggling) : तालुक्यातील वाहणाऱ्या अरूनावती नदीसह, अनेक नाल्यातील बेसुमार उपसा करून बिनबोभाट रात्री व पहाटेला रेतीने ट्रॅक्टर भरून चोरी सुरू आहे. त्याचबरोबर गौण खनिजाचीही वाहतूक सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने धावत धावत असल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सुरू असलेल्या वाळू तस्करी (Sand smuggling) व अवैध गौण खनिज तस्करीला स्थानिक प्रशासन सर्वस्वी जबाबदार असून पोलीस व महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्य यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गौण खनिजाचीही चोरी थांबता थांबेना
रात्री बे रात्री नदी पात्र व नाल्यातून अवैध रेती उपसा व (Sand smuggling) गौण खनिजची वाहतूक करून वाहन सुसाट धावत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. असे असताना महसूल व (Police Department) पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यातील कसूर करण्याने अपघात घडण्याचे प्रकार घडतात. व खुलेआम रेती व गौण खनिजाची तस्करी होत आहे. मात्र त्या रेती व गौण खनिजाची तस्करी (Sand smuggling) करणाऱ्यावर कुठली कार्यवाही होतांना दिसून येत नाही. चोरी करणे हा गुन्हा आहे, तर चोरी करणाऱ्यांना पाठबळ देणे हा सुध्दा गुन्हा आहे. वाळू व गौण खनिज संबंधाने नागरिकांनी तक्रार केली तर तक्रार धारकालाच दम देण्यात येत असल्याची ओरड आहे. यावरून पगार शासनाचा काम मात्र वाळू व गौण खनिज तस्कराचा अशीच परिस्थीती प्रशासनाची झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील अरुणावती नदीपात्र, नदी व अनेक नाल्यातून अवैध वाळू तस्करी व अनेक भागातील अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रकरणी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून चुकीचे काम करणारे स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाळू व गौण खनिज तस्करीसाठी ट्रॅक्टरचा वापर!
ट्रॅक्टर वाहनाकडे शेती उपयोगी साधन म्हणून पाहिले जाते, मात्र सध्या ट्रॅक्टर या वाहनाचा सर्वात जास्त वापर हा रेती व गौण खनिज (Sand smuggling) तस्करीसाठी सुरू आहे. याकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे लक्ष कमी झाल्यामुळे वाळू व गौण खनिज तस्करीसाठी ट्रॅक्टर हे वाहन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना असला तरी बरेच अवैध वाळू व गौण खनिजचे ट्रॅक्टर हे अल्पवयीन मुले चालवित असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संबंधित (Revenue Department) विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.