नवी दिल्ली (New Delhi) : लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. पहिल्या टप्प्यात 102 तर दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले. एकूण 190 जागांवर मतदान पूर्ण झाले. दरम्यान, काँग्रेस निवडणूक समितीची उद्या शनिवारी बैठक होत आहे. यूपीच्या अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांच्या नावांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेठीतून आणि काँग्रेसच्या सरचिटणीस (Priyanka Gandhi) प्रियंका गांधी वड्रा यांना (RaeBareli Constituency) रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरदार मागणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आधीच निवडणूक लढवत आहेत, तर प्रियांका गांधी यांनी अद्याप निवडणूक लढवलेली नाही. (Rahul Gandhi) राहुल गांधी यांच्या वायनाड जागेवर मतदान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटच्या राज्य निवडणूक समितीने अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची नावे सुचवली आहेत.
अमेठी आणि रायबरेलीसाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. (LokSabha Election) वायनाड निवडणुकीपर्यंत काँग्रेस ठप्प होती. मात्र वायनाडची निवडणूक संपल्यानंतर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतून आणि प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मानले जात आहे.