नवी दिल्ली (New Delhi) : भारतीय जनता पक्षाने (BJP) आज ओडिशा (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. चौथ्या यादीत 8 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या यादीत चार नेत्यांची नावे आहेत, जे आधी सत्ताधारी पक्ष बीजदमध्ये होते पण, आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. (LokSabha election) लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही होतआहे. यासाठी भाजप, बीजद, काँग्रेससह इतर पक्षही जोरदार प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 140 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर बीजदने 141 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर (Congress) काँग्रेसने आतापर्यंत 138 उमेदवार उभे केले आहेत.
लोकसभा निवडणुकीसोबतच (LokSabha election) राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. सध्या ओडिशात बिजू जनता दलाचे सरकार आहे. ज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. राज्य विधानसभेत 146 सदस्य आहेत. 2019 मध्ये झालेल्या (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत बीजेडीने सर्वाधिक 112 जागा जिंकल्या आहेत. यानंतर भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसचे 9 आणि सीपीएमचे 1 आमदार विजयी झाले. याशिवाय 1 अपक्षही विजयी झाला होता.
BJP releases fourth list of candidates for the upcoming Odisha Assembly elections. pic.twitter.com/Kav7gF6k2M
— ANI (@ANI) April 27, 2024