नवी दिल्ली (Lok Sabha Election Result 2024) : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election Result) 400 पार जागा मिळविण्याचा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता येण्याची शक्यता कमीच आहे. बहुमतासाठी 272 चा आकडा पार करावा लागणार आहे. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार, एकटा भाजप 243 जागांवर आघाडीवर आहे. NDA आघाडी 289 जागांवर आघाडीवर असली तरी, INDIA आघाडी देखील कडवी झुंज देत असून 236 जागांवर आघाडीवर आहे.
बंगालमध्ये TMCची आकडेवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. बंगालमध्ये TMC मोठी भूमिका बजावताना दिसत आहे. बंगालमधील एकूण 42 जागांपैकी तृणमूल 31 जागांवर आघाडीवर (Election Result) आहे. असे झाल्यास भाजपला येथे नुकसान सहन करावे लागत आहे. भाजप 10 जागांवर पुढे आहे. उत्तर प्रदेशात NDA आघाडीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. एकूण 80 जागांपैकी सपा 37 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे.
भाजप या पक्षांशी करणार हातमिळवणी?
भाजप NDA आघाडीच्या पक्षांसह बहुमतापासून दूर गेला तर, केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी TMC आणि समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करू शकेल की दोन्ही पक्षांमध्ये हेराफेरीचे राजकारण दिसेल. TMC हा यापूर्वीच केंद्रात NDAचा पाठिंबा देणारा पक्ष आहे. वाजपेयी सरकारमध्ये ममता बॅनर्जी NDAच्या सहयोगी राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत (Election Result) राजकीय फायद्यासाठी TMCने पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली तर अतिशयोक्ती होणार नाही.