नवी दिल्ली (Lok Sabha Election Results 2024) :पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुका (Election Results 2024) होत आहे. ज्यामध्ये INDIA अलायन्स आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया अलायन्स 3 जागांवर आघाडीवर आहे. तर NDM 2 जागांवर आघाडीवर आहे. माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये ओमर अब्दुल्ला आघाडीवर आहेत, तर मेहबुबा मुफ्ती त्यांच्या मतदारसंघात मागे आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, नॅशनल कॉन्फरन्स (NC) चे ओमर अब्दुल्ला बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी (Jammu-Kashmir Lok Sabha) जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स (JKPC) चे सज्जाद गनी लोन यांच्यावर आघाडीवर आहेत.
येथे CLICK करा: BJP आघाडीचे “400 पार”चे स्वप्न भंगले?
अनंतनाग-राजौरीमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती एनसीचे उमेदवार मियां अल्ताफ अहमद यांच्या मागे आहेत. दरम्यान, (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांवर विश्वास व्यक्त केला. भारतीय जनतेने विक्रमी संख्येने मतदान केले आणि त्यांचे सरकार पुन्हा निवडून दिले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली की, जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका सुरू होतील. (Election Results 2024) निवडणूक आयोगाने उच्च मतदानाचे वर्णन लोकशाही सहभागाचे सकारात्मक लक्षण मानले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आम्ही लवकरच (Jammu-Kashmir Lok Sabha) जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू करू. आम्ही खूप उत्साहित आहोत. हा सर्वात समाधानाचा क्षण आहे.