नागपूर (Lok Sabha Election Results 2024) : महाराष्ट्रातील NDA आघाडीचा परिणाम निकालावर (Election Results) कमी होताना दिसत आहे. एकूण 48 जागांपैकी NDA 20 जागांवर तर INDIA अलायन्स 27 जागांवर आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रातील हायप्रोफाईल सीट नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांचा विजय निश्चित करण्यात आलेला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून मा.नितीन गडकरी यांचा विजय झाला असून, ते 109841 मतांनी विजयी झाले आहेत. फक्त अधिकृत घोषणा उर्वरित आहे.
महाराष्ट्रातील हॉट सीट नागपूरची लोकसभा निवडणूक खूपच रंजक झाली आहे. केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी भाजपकडून येथे निवडणूक लढवली असून, काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी तगडी टक्कर दिली.
2019 मध्ये गडकरींनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा 2,16,000 मतांच्या फरकाने पराभव करून जागा राखली होती. यावेळी गडकरींचा सामना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी होती. जे सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मागे पडले आहेत. 2019 च्या निवडणुकीत (Nitin Gadkari) नितीन गडकरी येथून विजयी झाले होते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा दारूण पराभव झाला होता. नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये नागपुरातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि सात वेळा काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांचा 2,84,000 मतांनी पराभव केला.
नागपूर मतदारसंघातील आकडेवारी
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) आघाडीवर असून, त्यांचा विजय निश्चित करण्यात आला आहे. ते 33 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते, तर काँग्रेसचे विकास ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.