नवी दिल्ली (Lok Sabha Election Results 2024) : देशात पुन्हा एकदा NDA ने हॅट्ट्रिक केली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थकांमध्ये पोहोचले. भाजपच्या नेतृत्वाखालील NDAला पूर्ण बहुमत मिळाले आहे. एनडीएला 291 जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया ब्लॉकने 234 जागा गाठल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थकांमध्ये भाजपच्या मुख्यालयात पोहोचले. जिथे भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. NDAच्या विजयानंतर त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘भारत माता की जय’ आणि ‘जय जगन्नाथ’ने केली.
आजचा दिवस खूप छान : PM Modi
निवडणुकीच्या निकालानंतर पीएम मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, आजचा दिवस अतिशय शुभ आहे. या शुभ दिवशी एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. ते म्हणाले की आम्ही जनतेचे खूप आभारी आहोत. जनतेने देशवासीयांचा विश्वास व्यक्त केला आहे.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "चुनाव के इस जनादेश के कई पहलू हैं, 1962 के बाद पहली बार कोई सरकार अपने दो कार्यकाल पूरे करने के बाद तीसरी बार आई है। राज्यों में जहां भी विधानसभा चुनाव हुए वहां NDA को भव्य विजय मिली है… चाहे अरुणाचल प्रदेश हो, ओडिशा हो, आंध्र… pic.twitter.com/JTFJp7ae6D
— ANI_HindiNews (@AHindinews) June 4, 2024
बाह्य शक्तींना आरसा दाखवला: PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी या निवडणुकीत विक्रमी मतदान करून अभूतपूर्व उत्साह दाखवला असून, जगभरात भारताची बदनामी करणाऱ्या शक्तींना आरसा दाखवला आहे. विजयाच्या या पवित्र उत्सवानिमित्त मी जनतेला आदरपूर्वक नमन करतो.
पंतप्रधान मोदीनीं सांगितले ऐतिहासिक जनादेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या निवडणुकीच्या जनादेशाला अनेक पैलू आहेत. 1962 नंतर पहिल्यांदाच दोन टर्म पूर्ण करून तिसऱ्यांदा सरकार आले आहे. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तिथे एनडीएला अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश किंवा सिक्कीम असो, या राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला आहे.