पुसद (yavatmal) : नुकतीच लोकसभेची निवडणूक (LokSabha Election) पार पडली त्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पुसद विधानसभा मतदारसंघ मध्ये २६ एप्रिल रोजी३३७ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यामध्ये मतदानाचा टक्का फारसा वाढत नाही. तर मुस्लिम बांधव राहत असलेल्या प्रभागांमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर मात्र भर उन्हातही मोठ्या रांगा मतदानाकरिता लागलेल्या दिसत होत्या.
पुसद विधानसभा (Legislative Assembly) मतदारसंघांमध्ये एकूण मतदार ३ लाख ८६९२ होते तर त्यापैकी १ लाख १७९५६ मतदारांनी मतदान करण्यापासून लांब राहणे पसंत केले. अशा मतदारांना कोणत्याही शासकीय सवलती व्यावसायिक राजकीय शैक्षणिक देण्यात येऊ नयेत यांचे आधार कार्ड राशन कार्ड लायसन्स व्यावसायिक शासनाने रद्द कराव्यात. जेणेकरून यांना राष्ट्रीय कर्तव्यापासून आपण का पळ काढला याची जाणीव होईल. शहरांमध्ये ही तशीच परिस्थिती दिसली. पुसद शहरात ५७ मतदान केंद्रावर ३५९४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रीय कर्तव्यात आपली जबाबदारी पार पडली. तर शहरात एकूण मतदान ६१हजार ४१६ इतके आहे. मात्र त्यापैकी आपलं राष्ट्रीय कर्तव्य केवळ ३५९४ मतदारांनी बजावलं उर्वरित मतदारांचं सर्व अधिकार आयोगाने काढून घ्याव्यात अशी एक विचारसरणी रुजू होत आहे.
कारण आयोगाने हे अधोरेखित करायला हवं की, झालेलं मतदान खरोखरच सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब हातगाडीवाले फळ विक्रेते भांडी घासणारे सामान्य नागरिक घरकाम करणारे दुकानात काम करणारे सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्याची जाण ठेवत. मतदान करून कोणत्याही सरकारला अपेक्षित मत देण्याचं भान ठेवलं. दुर्दैव भारताचं राष्ट्राचं (Legislative Assembly) पुसद की एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानापासून वळ काढला संख्या कमी नव्हे तब्बल १ लाख १७ हजार ९५६ इतके मतदार पळपुटे निघालेत यामध्ये सर्वाधिक उच्चशिक्षित व्यावसायिक कृषी व्यवसायिक डॉ. शिक्षक पेन्शनधारक असे महानुभव आहेत, हे विशेष.