नवी दिल्ली (New Delhi) : लोकसभा निवडणूक 2024 च्या (LokSabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर आज 6 वाजता मतदान संपले. या जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 65 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कर्नाटकातील 28 पैकी 14 जागा, राजस्थानमधील 13 जागा, महाराष्ट्र (Maharashtra Elections)आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशातील 6 जागा, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आणि मणिपूरमधील प्रत्येकी 3 जागांवर मतदान झाले. आज त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी 1 जागासाठी मतदान पूर्ण झाले आहे.
आज लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक 76.23 टक्के मतदान झाले. दरम्यान, सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.64 टक्के मतदान झाले. मणिपूरमध्ये 76.06 टक्के, छत्तीसगडमध्ये 72.13 टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये 71.84 टक्के मतदान झाले. त्याचप्रमाणे आसाममध्ये 70.66 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 67.22 टक्के आणि केरळमध्ये 63.97 टक्के मतदान झाले. केरळमध्ये 63.97 टक्के आणि कर्नाटकात 63.90 टक्के मतदान झाले, तर राजस्थानमध्ये 59.19 टक्के मतदान झाले. (LokSabha Constituency) मध्य प्रदेशात 54.42 टक्के तर बिहारमध्ये 53.03 टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रात 8 मतदारसंघात 53.51 टक्के मतदान झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान हिंगोली मतदारसंघात मतदान झाले. वर्धा 56.6%, अकोला 52.49%, अमरावती 54.50%, बुलडाणा 52.24%, हिंगोली 52.03%, नांदेड 52.47%, परभणी 53.79%, यवतमाळ-वाशिम 54.04% मतदानाची नोंद करण्यात आली आहे.