परभणी (Parbhani) : शहरातील (Parbhani Election) अक्षदा मंगल कार्यालय ते विद्यापीठाकळे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रेल्वे ब्रिजचे काम कासवगतीने सुरू आहे. परिसरात राहणाऱ्या राहिवश्यना याचा फटका बसत आहे. ब्रिजच्या कामामुळे जवळून वाहणाऱ्या नाला मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे. ब्रिज जवळपास राहणाऱ्या नागरिकांना सदरील नाल्याच्या पाणी घरात शिरत असल्याने संसार उपयोगी साहित्य नष्ट झाला असून, नागरिकांनी जोपर्यत महानगरपालिका हा नाला स्वच्छ करणार नाही. तर उद्या आम्ही (LokSabha Election) मतदानावर बहिष्कार टाकू, अशी प्रतिक्रिया देशोन्नतीला डिजिटलला बोलताना दिली.