नवी दिल्ली (LokSabha Election Results 2024) : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) स्थिती शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी संपले आहे. एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. या सर्वांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील एक्झिट पोलची (Exit polls) आकडेवारी सर्वात जास्त चर्चेत आहे. यूपीमधील बहुतांश एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) 62 ते 70 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी (SP) च्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी 8 ते 18 जागा जिंकू शकते. मात्र, यूपीमधील त्या 10 जागा कोणत्या, जिथे (Election Results) भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे.
येथे मोदी-योगी जादू चालली नाही तर…
एक्झिट पोलनुसार, यावेळी सपा-काँग्रेस अमेठी, रायबरेली, जौनपूर, घोसी, गाझीपूर, कन्नौज, मैनपुरी, आझमगड, संभल आणि फिरोजाबादसह 10 जागा जिंकू शकतात. याशिवाय 5 ते 10 जागांवर इंडिया आघाडी (Election Results) आणि NDA यांच्यात मोठी लढत आहे.
एक्झिट पोलचे आकडे काय?
– Axis My India च्या मते, NDA 66 जागा जिंकू शकते. तर (India Alliance) इंडिया आघाडी 10 जागा जिंकू शकते आणि इतर 3 जागा जिंकू शकतात.
– पोलस्टर PMARQ नुसार, NDA 69 जागा जिंकू शकते. तर इंडिया आघाडी 11 जागा जिंकू शकते.
– मॅट्रिझच्या अंदाजानुसार, NDA 69-74 जागा जिंकेल तर इंडिया अलायन्स 6-11 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे.
– डी-डायनॅमिक्सनुसार, एनडीए 69 जागा जिंकेल तर (India Alliance) इंडिया अलायन्स 11 जागा जिंकेल.
– न्यूज नेशनच्या अंदाजानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 67 जागा मिळतील आणि इंडिया अलायन्सला 10 जागा मिळतील (Election Results) तर इतरांना 3 जागा मिळतील.